• A
  • A
  • A
धनंजय मुंडेंची वीर जवान निनाद मांडवगणेंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

नाशिक - जम्मू-काश्मीर येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचे सुपुत्र स्कॉड्रन लिडर निनाद मांडवगणे यांना वीरमरण आले होते. मांडवगणे कुटुंबाला बुधवारी विरोध पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विद्यार्थिनींच्या हस्ते १ लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.


काही दिवसांपूर्वी नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाकडून धनंजय मुंडे यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारदेखील उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी पुरस्काराची मिळालेली ५१ हजार रुपयांची रक्कम आणि वैयक्तिक ५१ हजार रुपयांची मदत निनाद मांडवगणे यांची २ वर्षांची मुलगी निवेदिता हिला देण्याचे आपल्या भाषणात जाहीर केले होते.
याचाच भाग म्हणून माजी आमदार जयंत जाधव यांची कन्या सुप्रिया जाधव आणि विद्यार्थिनींनी निनाद यांच्या घरी जाऊन मांडवगणे कुटुंबाची विचारपूस करत त्यांना ही रक्कम सुपुर्द केली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES