• A
  • A
  • A
सावधान ! आता सोशल मीडियावर असणार नाशिक पोलिसांचा वॉच

नाशिक - निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असूनही व्हॉट्सअॅप, फेसबुकवर राजकीय शत्रूंकडून एकमेकांवर कुरघोडी केली जाते. यासोबतच राहुल गांधी तसेच नरेंद्र मोदींवर अनेक विनोद व्हायरल केले जात आहेत. मात्र, आता यावर पोलिसांचा वॉच राहणार आहे. यासाठी विशेष सायबर सेल कार्यन्वित करण्यात आला आहे.

आयुक्त विश्वास नांगरे पाटील माहिती देताना


चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. निवडणुकांचा बिगुल वाजला असून अनेक पक्षांच्या उमेदवारांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून प्रचार केला जात असल्याचे सध्या बघायला मिळते. मात्र, यासोबतच अनेक राजकीय शत्रूंकडून याच माध्यमातून एकमेकांवर टीका-टिप्पणी केली जात असून सोशल मीडियाचा एकप्रकारे गैरवापर केला जात आहे. त्यामुळे, अशा पोस्ट कोणाच्या निदर्शनास आल्यास सायबर पोलिसांना कळवा, असे आवाहनही नाशिक पोलिसांनी केले आहे.
नाशिक शहरातील असंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त आणि नजर असणार आहे. या विशेष पोलीस बंदोबस्तासाठी पोलिसांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. याचबरोबर शहराच्या प्रमुख चौकात पोलिसांची नजर राहणार आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES