• A
  • A
  • A
कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब, पोलिसांच्या तपासाअंती अफवा असल्याचे निष्पन्न

नाशिक - वाराणसीला निघालेल्या कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन पोलिसांना मिळाला. त्यामुळे नाशिकमधील इगतपूरी रेल्वे स्थानकावर ही रेल्वे थांबवून ३ तास गाडीची कसून तपासणी करण्यात आली.


मुंबई लोकमान्य टर्मिनलवरून कामायनी एक्स्प्रेस वाराणसीला निघाला होती. दरम्यान, या एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलिसांनी ही माहिती रेल्वे लोहमार्ग पोलीस कंट्रोल रूमला कळवली.

हेही वाचा - नाशिक लोकसभा मतदारसंघ : आजी-माजी खासदरांमध्ये होणार लढत
त्यानंतर काही वेळातच इगतपुरी रेल्वे पोलिसांनी इगतपुरी स्थनाकावर ही गाडी थांबवली. यावेळी पोलिसांनी प्रवाशांना रेल्वेखाली उतरवून श्वान आणि बॉम्ब स्कॉड पथकाद्वारे रेल्वे तसेच रेल्वे स्थानकाची २ ते अडीच तास कसून तपासणी केली. तापसणी अंती काही न मिळाल्याने गाडी वाराणसीच्या दिशेने रवाना करण्यात आली.

हेही वाचा - पदभार स्वीकारताच नाशिकच्या पोलीस अधीक्षकांचे धाडसत्र
पुलवामा हल्यानंतर पोलीस विशेष सतर्कता बाळगून असून कोणत्याही प्रकारची धोका पत्करण्यास तयार नाही. तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला आहे. वेळोवेळी रेल्वे स्थानकाची तपासणी श्वान पथक आणि बॉम्ब स्कॉडकडून केली जात आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES