• A
  • A
  • A
नाशिक लोकसभा मतदारसंघ : आजी-माजी खासदरांमध्ये होणार लढत

नाशिक - लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदा नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून खासदार हेमंत गोडसे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार समीर भुजबळ यांचे नाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजी-माजी खासदारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, पक्षाकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


नाशिक शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना भाजपकडून आव्हान मिळण्याची शक्यता होती. मात्र, युती झाल्याने गोडसे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. तर माजी आमदार माणिकराव कोकाटे हे देखील सेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहे, तर सेना नगरसेवक शिवाजी चुंबळे यांनी देखील शिवसेनेने टिकिट दिले तर लोकसभा निवडणूक लढू असे जाहीर केले आहे. त्यामुळे गोडसे यांना पक्षातीलच अंतर्गत विरोधाला सामोरे जावे लागणार आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून समीर भुजबळ पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुरुवातीला भुजबळ कुटुंबातील छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि शेफाली समीर भुजबळ यातील एक जण निवडणूक रिंगणात असतील अशी शक्यता होती. मात्र, काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला होता. या कार्यक्रमात समीर भुजबळ यांचे राष्ट्रवादीकडून होर्डिंग माध्यमातून ब्रँडिंग केल्याचे दिसून आले, तसेच मी जेलमधून सुखरूप बाहेर आलो ते फक्त समीर भुजबळ यांच्यामुळे असे म्हणत छगन भुजबळ समीर भुजबळ यांच्या उमेदवारीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये असलेले किंतु परंतु काढून टाकले.
हेही वाचा - पदभार स्वीकारताच नाशिकच्या पोलीस अधीक्षकांचे धाडसत्र
निवडणुकीच्या अगोदरच सोशल मीडियामधून सेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. एकीकडे भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी नाशिकला हवे आहे खंबीर नेतृत्व, या बॅनरखाली भुजबळांच्या काळात झालेला नाशिकचा विकास मतदारांना पुढे ठेवला जात आहे, तर सेनेच्या कार्यकर्त्यांकडून नाशिकला काय नको तर गुंड आणि गुंडगिरीला चालना देणारे नेतृत्व, असे प्रतिउत्तर दिले जात आहे.आतापर्यंत ८ वेळा नाशिकची जागा काँग्रेस पक्षाने जिंकली आहे. मात्र, गेल्या २० वर्षात प्रतिनिधित्वच नाही अशी परिस्थिती आहे, तर काँग्रेस खालोखाल शिवेसनेच्या खासदाराला संसदेत नाशिकचे प्रतिनिधित्व करण्यास मतदारांनी संधी दिली तर, दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत. तर भाजप, शेड्युल कास्ट फेडरेशन, लोकदल यांना प्रत्येकी एकदा विजयी होण्याची संधी मिळाली.नाशिकमध्ये ६ विधानसभा मतदार संघ मिळून एक लोकसभा मतदारसंघ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल बघितला तर ३ जागा भाजपकडे, २ शिवसेनेकडे तर एक जागा काँग्रेसकडे आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातील ६५ टक्के मतदान नाशिक शहरात मोडणाऱ्या साडेतीन विधानसभा मतदार संघातील आहे, नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम आणि देवळाली मतदार संघातील काही भाग शहरी मतदार संघात येतो. नाशिक लोकसभा मतदार संघात १८ लाख ५३ हजार ५११ मतदार संख्या आहे, यामध्ये ९ लाख ७४ हजार ९८८ पुरुष, तर ८ लाख ७८ हजार ४५० महिला, ६७ तृतीयपंथी आणि ६ एनआरआय मतदारांचा समावेश आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES