• A
  • A
  • A
नाशिकमध्ये बिबटयाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

नाशिक - जिल्ह्यातील दिंडोरीत तालुक्यातील मातेरेवाडी गावातील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. देविदास जाधव असे या शेतकऱ्याचे नाव असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संग्रहित छायाचित्र


या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार देविदास जाधव हे सकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या शेताला पाणी देण्यासाठी विहिरीची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बाजूच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने जाधव यांच्यावर अचानक हल्ला चढवला. यामध्ये त्यांच्यात आणि बिबट्यात झटापट झाली. जाधव यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. या दरम्यान जाधव यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरच्यांनी धाव घेतल्याने बिबट्याने पुन्हा शेतात धूम ठोकली. थंडी असल्याने गळ्यात मफलर घातल्याने मी बचावलो असल्याचे जाधव यांनी सांगितले.
सुरुवातीला त्यांच्यावर दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, गालावरची जखम खोलवर असल्याने त्यांना नाशिकचे प्रसिद्ध स्किन स्पेशलिस्ट डॉ राजेंद्र नेहते यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दिंडोरी तालुक्यात मोठया प्रमाणात उसाची शेती असल्याने बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES