• A
  • A
  • A
नाशिक महानगरपालिका : भाजपने मंजूर केला १९८३ कोटींचा अर्थसंकल्प

नाशिक - केंद्रात आणि राज्यात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने तब्बल १९८३ कोटींचा अर्थसंकल्प आज झालेल्या विशेष महासभेत मंजूर केला. या अर्थसंकल्पात नाशिककरांना खुश करणाऱ्या अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे.


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नाशिक महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने विविध घोषणांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तातडीने विशेष महासभा बोलवत अर्थसंकल्प मंजूर केला गेला. यामध्ये महिला दिनाचे औचित्य साधत पालिकेकडून नाशिक शहरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीस पाच हजार रुपये दिले जाणार आहे. यासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून नाशिकची सुकन्या योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.

या बरोबरच मनपा कर्मचाऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करणे नियमित करदात्यांसाठी ५० हजार रुपयांचा अपघात विमा अशा महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे यासह नाशिककरांना खुश करणाऱ्या अनेक योजना आजच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे.
नाशिक शहरात शुक्रवारपासून सुकन्या योजना लागू होणार
महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवारपासून नाशिक शहरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे बँकेत पाच हजार रुपयांच्या ठेवी ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात महापालिकेकडून प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण घोषणा

  • प्रभागात कामे करण्यासाठी नगरसेवकांना प्रत्येकी 75 लाख रुपये
  • नियमित करदात्यांसाठी ५० हजार रूपयांचा अपघाता विमा योजना
  • शहरालगत असलेल्या खेड्यांच्या विकासासाठी अतिरिक्त निधी
  • शहरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नागरिकांना लोककल्याण पुरस्कार देण्यासाठी विशेष तरतूद
  • पालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याचे आदेश
  • प्रभाग समिती अतंर्गत पाच लाखाच्या आतील कामे मंजूर करण्याची परवानगी
सत्ताधारी भाजपने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाचे पालिकेतील विरोधकांनी स्वागत केले आहे. उत्पन्नवाढीसाठी सत्ताधारी भाजपाने केलेल्या घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करणे गरजेचे असून, नागपूर महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेलाही विशेष अनुदान देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
मागील वर्षभरात तुकाराम मुंढे यांनी अनेक कामांना निधीअभावी ब्रेक लावला होता. त्यामुळे कामेच होत नसल्याने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची सभागृहात आक्रमक भूमिका पाहायला मिळत होती. मात्र आजच्या महासभेत नगरसेवक निधी, प्रभाग निधी आणि विशेष निधीचा समावेश करण्यात आल्याने सर्वसामान्य नाशिकरांबरोबरच नगरसेवकांनाही खुश करणारा अर्थसंकल्प दुरुस्ती व उपसूचनांसह मंजूर करण्यात आला.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES