• A
  • A
  • A
जर पुन्हा हेच सरकार सत्तेवर आलं तर हुकूमशाही येईल - शरद पवार

नाशिक - राज्यात आणि केंद्रातील सरकारला गेल्या साडेचार वर्षात प्रत्येक निर्णयात अपयश आले आहे. केंद्र सरकारची नोटबंदी फसली, राज्यातील कर्जमाफीदेखील फसली आहे, शेतकरी आत्महत्या सुरुच आहेत. शेतकऱ्यांना हे सरकार १७ रुपयांची मदत देत आहे. मात्र, ही तर शेतकऱ्यांची थट्टा आहे. हे सरकार म्हणजे लबाडाच्या घरचे अावताण असून जर पुन्हा हेच सरकार सत्तेवर आले तर हुकूमशाही येईल, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.


शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्यतील सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्याबद्दल बोलण योग्य नाही. पंतप्रधानांनी बोलताना जपून बोलले पाहिजे, असा सल्ला देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे. मोदींच्या रूपाने देशात आपत्ती आली आहे. त्यामुळे संकुचित विचार करणाऱ्यांच्या हातात हा देश नको असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा -त्र्यंबकेश्वर मंदिरातील कर्मचारी संपावर, तरीही महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची मांदियाळी
पवार म्हणाले, शेतकऱ्यांना 6 हजार नको, शेतीमालाला किंमत द्या. हे सरकार शेतकऱ्यांना दररोज 17 रुपये देत आहे. मात्र, रोजगार हमीवर काम करणाऱ्यालादेखील 350 रुपये रोज मिळतो. त्यामुळे सरकारने दिलेली मदत म्हणजे एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोपी पवारांनी यावेळी केला. संपुर्ण शेती अर्थव्यवस्था संकटात आली असून हे सरकार म्हणजे लबाडाच्या घरचं अावताण आहे, यांच्याकडून आश्वासनाशिवाय काही मिळत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा -विखे पाटलांनी घेतली हुतात्मा निनाद यांच्या कुटुंबीयांची भेट
अंबानींवरही निशाणा -
यावेळी बोलताना पवारांनी राफेल प्रकरणावरूनही मोदी सरकारवर निशाणा साधला. राफेलची किंमत 530 कोटी रुपये होती. मनमोहन सिंग सरकारने घासाघीस करून ही किंमत ठरवली होती. मात्र, आता तेच विमान 1600 कोटीत घेतले जात आहे. संरक्षण खात्यात खरेदीसाठी एजंट नसावा अशी सरकारची भूमिका होती. मात्र, यांनी एजंट नेमला असल्याचा आरोपही पवरांनी केला. अंबानी या क्षेत्रातील अत्यंत ज्ञानी माणूस आहेत, म्हणूनच त्यांना राफेलचा ठेका दिला असल्याची उपरोधिक टीकाही पवारांनी यावेळी केली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES