• A
  • A
  • A
पथनाट्यातून केली अवयवदानाची जागृती, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाची अनोखी सुरुवात

नाशिक - वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी शहरात फेरी काढली. यात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात रविवारी झाली. याचे उद्घाटन या फेरीने करण्यात आले.


रविवारी सकाळी ८ वाजता फेरीला जेहान सर्कल येथून सुरुवात झाली. येथे प्राध्यापक डॉक्टर सिंग आणि सुनील देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अवयवदानाचे संदेश लिहलेले फलक घेऊन विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले. पोवाडा, भजन, भारुडे, गोंधळ अशा विविध माध्यमातून अवयवदानाबद्दल जागृती करण्यात आली. अवयवदानाच्या घोषणा देत देत ही फेरी गंगापूर रोडहून रावसाहेब थोरात सभागृहात पोहोचली. वाटेमध्ये ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्य व अवयवदानाच्या भजनांचे सादरीकरण केले. रस्त्याने जाणार्‍या-येणार्‍या व्यक्तींना अवयवदानाची माहितीपत्रके वाटण्यात आली. टाळ आणि झांजांच्या गजरात ही फेरी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.
थोरात सभागृहाच्या मैदानावर पोचल्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर कालीदास चव्हाण यांच्यासमोर पथनाट्य केले गेले. त्यानंतर डॉक्टर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजसेवेचे बीज विद्यार्थी असतानाच मनात रुजवता येते आणि भावी आयुष्यात त्याचा उपयोग होतो, असे ते म्हणाले.
डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांच्या प्रोत्साहनातून व प्राध्यापक मेजर डॉ. जितेंद्र सिंग, मनिषा पाटील आणि डॉ. स्मिता आव्हाड यांच्या मार्गदर्शनातून ही फेरी अत्यंत यशस्वीरीत्या समाजाला एक मोलाचा संदेश देत संपन्न झाली.

महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात पुढाकार घेणारे सौरभ पटाईत व गणेश पांडे या विद्यार्थ्यांनी आयोजनाचे नेतृत्व केले. हर्षद, समीर, वैष्णवी, कृष्णा , हिना, श्रेयस, मयुरेश, स्वाती, संजना, निशिता, अभिषेक, संकेत, दिग्विजय, हर्षदा व गणेश या विद्यार्थ्यांनी पथनाट्य पोवाडा व भजन या सादरीकरणामध्ये सक्रिय सहभाग दिला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES