• A
  • A
  • A
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी कपिल यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी

नाशिक - बिबट्याच्या हल्यात जखमी झालेले ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कपिल भास्कर यांच्यावर गुरुजी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या डोक्याला ४० टाके पडले आहेत. जखमी कपिल भास्कर यांना भेटायला रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे.


हेही वाचा - 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी कपील यांच्यावरील बिबट्याच्या हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

शुक्रवारपासून कपिल भास्कर यांच्या भेटीला अनेकांनी गुरुजी रुग्णालयात गर्दी केली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली. खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, आमदार डॉ. राहुल आहेर, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, उप-जिल्हाधिकारी रामदास खेडकर, मराठी अभिनेता अभिजित खांडकेकर, वन अधिकारी विजय शेळके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अनेकांनी त्यांची भेट घेतली.

हेही वाचा - नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कपील भास्कर जखमी

नाशिकच्या गंगापूर रोड भागातील पाम स्प्रिंग भागात चित्रीकरण करत असताना अचानक बिबट्याने भास्कर यांच्या डोक्यावर हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले. स्वत:चा जीव धोक्यात घालून पत्रकारिता करणाऱ्या भास्कर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे छायाचित्रेही तेवढीच बोलकी आहेत.

हेही वाचा - राज ठाकरेंच्या मोदींवरील टीकेला भाजपकडून त्याच व्यंगचित्रातून प्रत्युत्तर




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES