नाशिकमध्ये ४ जणांवर बिबट्याचा हल्ला, थरार कॅमेऱ्यात कैद
नाशिक - गंगापारूमध्ये बिबट्याने ४ जणांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. अत्यंत सावधपणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. बिबट्याचा हा थरार कॅमेरात कैद करण्यात आला आहे.
या हल्ल्यात ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कपील भास्कर हे जखमी झाले आहेत. वनविभाग व पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. बिबट्याला जेरबंद करण्याची मोहिम सुरु झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ४ जण जखमी झाले. अखेर इमारतीतून बाहेर पडताना बिबट्याला जेरबंद करण्यात आले.