• A
  • A
  • A
नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कपील भास्कर जखमी

नाशिक - गंगापूर रोड भागातील पाम स्प्रिंग भागात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जखमी झाले. यात ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कपील भास्कर हे जखमी झाले. सुमारे २ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागास यश आले.

जखमी कपील भास्कर


हेही वाचा - जुन्नरमध्ये बिबट्याने केली मेंढपाळाच्या ४ महिन्यांच्या मुलीची शिकार
काल रात्रीपासून पाम स्प्रिंग परिसरात बिबट्या फिरत होता. याची माहिती ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कपील भास्कर यांना मिळाली. आज सकाळी ९ वाजता ते घटनास्थळी गेले. बिबट्या परिसरात आल्याचे समजताच नागरिकांनी गर्दी केली होती. बिबट्या एका फ्लॅटमध्ये शिरला. त्यानंतर तो खिडकीतुन बाहेर पडला. कपील भास्कर हे या घटनेचे चित्रण करत असताना बिबट्याने कपील भास्कर यांच्या डोक्यावर पंजा मारला. यामुळे कपील हे खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
हेही वाचा - महाराज बागेतील बिबट्याला जंतूसंसर्ग, वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आज सकाळी बिबट्याने परिसरात धुमाकूळ घातला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. वनविभाग व पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. बिबट्याला जेरबंद करण्याची मोहिम सुरु झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ४ जण जखमी झाले. अखेर इमारतीतून बाहेर पडताना बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
हेही वाचा - आडगाव शिवारात आढळला बिबट्याचा संशयास्पद मृतदेह

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES