• A
  • A
  • A
नाशिक - राहुड घाटात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ ठार

नाशिक - चांदवडच्या राहुड घाटात वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने बसला मागून धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.


अपघातात ठार झालेले हे वणी येथे रहिवासी होत. अपघातात ठार झालेल्यांची नावे महेंद्रकुमार समदडिया (पती), वंदना समदडिया (पत्नी), हिमांशू समदडिया (मुलगा) अशी आहेत. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

एस. टी. महामंडळाची बस नादुरुस्त झाल्याने चांदवडच्या राहुड घाटात सर्व्हिस रोडवर उभी होती. याच वेळी वणीच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीने उभ्या बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की चारचाकी बसच्या मागच्या बाजूने पूर्णपणे आता घुसून चुर झाली. यात वणीच्या समदडिया कुटुंबातील चार तिघांचामृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. हे कुटुंब लग्नावरून घरी जात होते. यात महेंद्रकुमार समदडिया ( पती), वंदना समदडिया (पत्नी), हिमांशू समदडिया (मुलगा) हे जागीच ठार झाले. प्रत्यक्षदर्शींनी चारचाकी गाडीचे टायर फुटल्याने गाडी बसवर आदळली, असे सांगितले. या अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
या अपघाताची नोंद चांदवड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून एकाच कुटुंबातील चार जणांवर नियतीने घाला घातल्याने वणी गावात शोककळा पसरली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES