• A
  • A
  • A
पडघम लोकसभेचे : काँग्रेसने बदलले १३ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष; नाशिकमध्ये डॉ. तुषार शेवाळे

नाशिक - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानुसार नाशिकसह राज्यभरातील १३ जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले आहेत. मागील १८ वर्षापासून नाशिक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाचे काम राजाराम पाटील पानगव्हाणे करत होते. त्यांच्या ठिकाणी आता मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा - नाशिकात बाळासाहेबांच्या चित्रांचे प्रदर्शन, कलाकारांची आगळीवेगळी आदरांजली
नाशिक जिल्हाध्यक्ष राजाराम पाटील पानगव्हाने यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनतर काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी चर्चा करुन जिल्ह्याचे नेतृत्व शेवाळे यांच्याकडे सोपवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी राहुल गांधी यांनी पदांधिकांऱ्यामध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहराध्यक्ष बदलीमुळे मात्र, काँग्रेस गटात चर्चांना ऊत आला आहे.

हेही वाचा -हुबेहुब बाळासाहेब ठाकरेंच्या चेहऱ्याची नाशिककरांना भुरळ

येत्या काळात भाजप सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णय विरोधात आंदोलन उभे करणार असून तसेच काँग्रेस पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांना एकत्र करणार असल्याचे मत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शेवाळे यांनी बोलताना व्यक्त केले. जिल्हा दौरा करुन जनतेचे प्रश्न जाणून घेण्याचा मानही शेवाळे यांनी बोलून दाखवला.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES