• A
  • A
  • A
नाशिकात बाळासाहेबांच्या चित्रांचे प्रदर्शन, कलाकारांची आगळीवेगळी आदरांजली

नाशिक - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज नाशिकमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी झाली. राज्यभरातून आलेल्या २०० कलाकारांनी बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या छटांच्या २०० चित्रांचे प्रदर्शन भरवून बाळासाहेबांमधल्या एका कलाकाराला आगळीवेगळी आदरांजली वाहिली.हेही वाचा - राष्ट्रभक्त ठाकरे नेहमीच स्मरणात राहतील - कंगना

आपल्या भाषणांनी उपस्थितांच्या मनात देशभक्तीचे अंगार फुलवणारे, भाषणापूर्वी छत्रपतींना अभिवादन करणारे, शांत निवांत क्षणी चिंतन करणारे बाळासाहेब या आणि अशा अनेक छटा सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळत आहेत. निमित्त आहे बाळासाहेबांच्या ९३ व्या जयंतीचं. राज्यभरातून आलेल्या २०० कलाकारांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या बाळासाहेबांच्या छबींचे प्रदर्शन शिवसेनेच्यावतीने भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी आणि नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

कलाकारांनी साकारलेले हे चित्र पाहताना बाळासाहेब समोर असल्याचा भास व्हावा एवढे हुबेहूब चित्र या कलाकारांनी रेखाटले आहेत. आपल्या मनात असलेले बाळासाहेब प्रत्येक कलाकाराने आपल्या पद्धतीने रेखाटले आहेत. त्यामुळे कधीही न पाहिलेले बाळासाहेब याठिकाणी पाहायला मिळतात. एका कणखर नेत्यासोबतच बाळासाहेब एक हळवं व्यक्तिमत्व आणि दर्जेदार कलाकार देखील होते. त्यामुळे राज्यातील कलाकारांनी यानिमित्त बाळासाहेबांना एक अनोखी आदरांजली वाहिली.


हेही वाचा - हुबेहुब बाळासाहेब ठाकरेंच्या चेहऱ्याची नाशिककरांना भुरळ

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES