• A
  • A
  • A
हुबेहुब बाळासाहेब ठाकरेंच्या चेहऱ्याची नाशिककरांना भुरळ

नाशिक - असं म्हणतात जगात एकाच चेहऱ्याचे 'सात' मिळते-जुळते चेहरे असतात. हे खरे वाटावे असे एक उदाहरण समोर आले आहे. येथील विवेक देवरे हे हुबेहुब बाळासाहेब ठाकरेंसारखे दिसतात, वागतात आणि बोलतातदेखील. त्यामुळे नाशिकच्या शिवसैनिकांत ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणूनच परिचीत आहेत.हेही वाचा - राष्ट्रभक्त ठाकरे नेहमीच स्मरणात राहतील - कंगना


बाळासाहेब ठाकरेंची आज ९३ वी जयंती. त्यांच्या जीवनावर आधारित सध्या सिनेमागृहात "ठाकरे" हा चित्रपट येत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे प्रतिबिंब अन्‌ अगदी अस्सल वाटावेत असे विवेक देवरे यांच्याबद्दलची अनेकांना कुतूहलता निर्माण होते.


विवेक महादेव देवरे (वय 41) हे मूळचे मालेगाव तालुक्‍यातील रावळगाव येथील राहणारे. गेल्या काही वर्षांपासून ते आपल्या परिवारासह नाशिक येथील सिडको परिसरात राहतात. ते कमर्शिय व्हेकल इन्शुरन्सचा व्यवसाय करतात. आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे. देवरे यांना एका व्यक्तिमत्वाने झपाटले आहे, ते म्हणजेच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. याला कारणही तसेच आहे, त्यांचा बाळासाहेबांसारखा दिसणारा चेहरा, पेहराव आणि देहबोली यामुळे त्यांच्या या बाळासाहेबरुपी चेहऱ्यावर सध्या हजारो शिवसैनिक व बाळासाहेब प्रेमी त्यांना भेटण्यासाठी, फोटो व सेल्फी काढण्यासाठी आतूर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


सिडकोतच नव्हे तर ते जातील तिथे त्यांच्याशी बोलण्यासाठी तसेच बाळासाहेबांसारख्या दिसणाऱ्या साधर्म्याबद्दल त्यांचे मत जाणून घेण्याचा अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांचे अनेक अनुभव सांगितले, मी स्वतःला भाग्यवान समजतो की देवाने माझा चेहरा बाळासाहेबांसारखा दिला. ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी पूर्ण आयुष्य खर्च केले. ज्यांच्या आवाजावर हजारो शिवसैनिक काहीही करण्यास तयार होते. अशा व्यक्तिमत्वाचा चेहरा मिळाल्याने मी स्वतःला धन्य समजतो, असं विवेक देवरे म्हणतात


हेही वाचा - राजकारणी बाळासाहेब ठाकरेंचे असे होते बॉलिवूड कनेक्शन


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES