• A
  • A
  • A
नांदूर मधमेश्वरमधील पक्षी अभयारण्यात असंख्य परदेशी पक्षांचा मृत्यू

नाशिक - जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वरला थंडीच्या दिवसात परदेशातून मोठ्या संख्येने पक्षी येतात. अशात नांदूर मधमेश्वरमधील पक्षी अभयारण्यातच असंख्य पक्षांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. या बाबत पक्षी मित्रांनी नाराजी व्यक्त केली आहे.


हेही वाचा - आडगाव शिवारात आढळला बिबट्याचा संशयास्पद मृतदेह
समोर आलेल्या घटनेनुसार मासेमारी करण्यासाठी मच्छीमारानी नांदूर मधमेश्वरमर धरणात जाळे टाकले होते आणि या जाळ्यात अडकून असंख्य परदेशी पक्षांचा मृत्यू झाला आहे. मात्र, पक्षीमित्रांना आणि गाईडला जाळ्यात अडकलेल्या अनेक पक्षांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या घटनेत जाळ्यात अडकून कॉमन क्रेन, डार्टर, कॉमन कूट, पान कावळे यांसह विविध प्रकारच्या बदकांचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे. वनविभागाने योग्य कारवाई न केल्यास पक्षीप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.पक्षी संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेल्या अभयारण्यातच स्थलांतरित, परदेशी दुर्मिळ प्रजातीच्या पक्षांचा जीव धोक्यात आला आहे. या धरणांत मासेमारी बंद करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये ऊस तोडणीवेळी आढळली बिबट्याची पाच पिल्ले
गेल्या काही वर्षामध्ये नांदूर मधमेश्वरमध्ये पक्षी पर्यटन वाढले आहे. लोक इथे येतात मोठ्याने गाणी वाजवणे, ओरडे असे प्रकार करतात. यामुळे याला सुद्धा एक प्रकारचे प्रदूषणच म्हणता येईल. यामुळे पक्ष्याना त्रास होतो. ते घाबरून जातात. ही गोष्ट देखील येथे येणाऱ्या नागरिकांनी लक्षात घ्यायला हवी, असे पक्षीमित्र आवर्जून सांगतात.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES