• A
  • A
  • A
नाशिक सुलाफेस्ट : संगीत महोत्सवाने मिळतेय अर्थव्यवस्थेला बळ

नाशिक - जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या सुलाफेस्ट २०१९ चे वेध आता संगीतप्रेमीसह पर्यटकांना वेध लागले आहेत. राहण्यासाठी हॉटेलची बुकिंग, जेवण, खरेदीसह देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे. सोबतच शहरातील रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होणार आहेत.

संग्रहित छायाचित्र - सुलाफेस्ट


सुला विनियार्ड्‌सच्या प्रांगणात होत असलेला संगीत महोत्सव संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. दुसरीकडे सुला फेस्टमुळे नाशिकच्या गारठलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
फेब्रुवारी २ व ३ ला महोत्सव सुरू होणार -
यंदाच्या महोत्सवामध्ये प्रसिद्ध गीतकार, गायक शंकर महादेवन हा मुख्य आकर्षण असणार आहे. दोन दिवसीय सुला फेस्टच्या व्यासपीठावर संगीतप्रेमींना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बँडसचे सादरीकरण अनुभवण्याची संधी फेब्रुवारी २ व ३ रोजी मिळणार आहे. त्यानिमित्त सुलाफेस्टची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. फेस्टमध्ये मंडप उभारणीसह अन्य विविध कामांद्वारे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सहभागी झालेले पर्यटक फेस्टच्यानिमित्त नाशिकला येणार आहेत. त्यामुळे शहराला मोठा महसूल मिळणार आहे.


सुलाफेस्टला पर्यटकांनी केलेली गर्दी, संग्रहित छायाचित्र-

१० हजार पर्यटक महोत्सवात होणार सहभागी - सुला विनियार्ड्सचे उपाध्यक्ष मोनित ढवळे म्हणाले, की सुलाफेस्टमध्ये सुमारे १० हजार पर्यटक सहभागी होत असतात. या कालावधीत शहरातील 80 ते 90 टक्क्‍यांपर्यंत हॉटेलचे रुम बुक झालेले असतात. आतापासूनच हॉटेलच्या बुकींगला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. वास्तव्यासोबत खाण्यापिण्यावरही पर्यटक खर्च करत असल्याने हॉटेल व्यावसायिकांना चांगले उत्पन्न मिळते. सोबत हॉटेलमध्ये स्वयंपाकी व अन्य कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध होतो. नजीकच्या शहरांमधील पर्यटक स्वतःच्या वाहनाने येत असल्याने स्थानिक पेट्रोल पंपांच्या व्यवसायातही वाढ होते.

शहराच्या विकासाला हातभार लावणाऱ्या क्षेत्रांपैकी पर्यटन हे महत्वाचे क्षेत्र आहे. त्यातही महोत्सवांच्या माध्यमातून पर्यटक आकर्षित होत असल्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी महोत्सव महत्वाची भुमिका बजावतात. साधारणत: सुला फेस्ट २०१७ मध्ये सहभागींनी महोत्सवात सरासरी यापूर्वी दोन हजार रूपये खर्च केले आहेत.

हेही वाचा-ट्विटरपाठोपाठ गुगलही राजकीय जाहिरातींची माहिती देणार ऑनलाईन
जगभरात नाशिकचे होतेय ब्रँडिंग -
मनोरंजनाने भरपूर असलेल्या सुलाफेस्टद्वारे फेस्टिव्हल पर्यटनाला चालना मिळत आहे. नाशिक भेटीची छायाचित्रे, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातून जगभर नाशिकची एका अर्थाने ब्रँडिंग होते आहे.

हेही वाचा-अमूलने बाजारात आणले उंटीणीचे दूध
रोजगाराच्या संधींमध्ये वाढ -
'फेस्टिव्हल टुरिझम' हा शहरातील स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठीदेखील निश्‍चित फायदेशीर ठरतो. नाशिक व सभोवतालच्या परिसरात विक्रेते, कलाकार, सुरक्षारक्षक, कार्यक्रम दिग्दर्शक, वैद्यकीय सुविधा आदींच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होते आहे. काहींकडून कार भाडे तत्वाने घेतली जात असल्याने खासगी बसचे मालक, वाहन चालक यांनाही कमाईचे साधन मिळते.

हेही वाचा-कच्च्या तेलाची आयातीमध्ये भारत चालू वर्षात चीनला टाकणार मागे
संस्कृतीची पडतेय छाप -
महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांकडून विविध ठिकाणी आवर्जून भेटी दिल्या जातात. शहराबाहेर असलेल्या सुला विनियार्ड्‌सच्या प्रांगणात फेस्ट होत असल्याने पोलीस यंत्रणेवर सुरक्षेचा ताण येत नाही. सोबत शहरात अस्वच्छता होण्याची भीतीदेखील राहत नाही. या कारणांनी सुला फेस्ट नाशिकच्या अर्थवस्थेला चालना देण्यासाठी महत्वाचा दुवा बनला आहे.

नाशिकची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अशा महोत्सवांची शहराला गरज आहे. भविष्यात नाशिकची ओळख 'वाईन कॅपिटल ऑफ इंडिया' सोबतच 'फेस्टिव्हल कॅपिटल' झाली तर त्याचा सर्वांनाच निश्‍चित फायदा होणार आहे.

वैशिष्ट्ये

* सुला फेस्टतून स्थानिकांना रोजगाराची मिळतेय संधी
* स्थानिक व्यावसायिक, सुरक्षा यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रास व्यवसाय वाढीसाठी पोषक
*पर्यटकांकडून ट्रास्पोर्ट, राहणे, खरेदी होत असल्याने एकंदरीत अर्थव्यवस्थेला पोहोचतो फायदा
*सुला फेस्टदरम्यान 90 टक्‍क्‍यांपर्यंत हॉटेल्स रूम बुकींग
* सुमारे 10 हजार पर्यटकांकडून फेस्टला दिली जाते भेटCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES