• A
  • A
  • A
महाविद्यालयात प्राध्यापिकेला कुंकू लावण्याचा तरुणाचा प्रयत्न, म्हणाला 'नोकरी लागली आहे, लग्न करु'

नाशिक - एकतर्फी प्रेमातून केटीएचएम महाविद्यालयातील प्राध्यापिकेला कुंकू लावण्याचा प्रयत्न झाल्याने महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. संशयिताविरोधात सरकार वाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

संशियत योगेश जावळे


नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या प्रसिद्ध केटीएचएम महाविद्यालयात मायक्रो बायोलॉजी लॅब विभागात एक प्राध्यापिका कार्यरत आहेत. त्या काम करत असताना अचानकपणे संशयित योगेश जावळे याने त्यांचा हात धरून मला नोकरी लागली आहे, आता तू माझ्याशी लग्न कर म्हणत खिशातून कुंकवाची डबी काढत त्यांच्या डोक्याला कुंकू लावण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या प्राध्यापिकेने आरडा-ओरड केल्यावर महाविद्यालयातील कर्मचारी तेथे धावून आले आणि त्यांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशियत योगेशने या प्राध्यापिकेसह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.

हेही वाचा-लग्नाअगोदरचे 'ते' फोटो व्हायरल करण्याची प्रेयसीला धमकी, घरात घुसून विवाहितेवर प्रियकराचा बलात्कार
या प्रकरणी योगेश विरोधात सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या आधी देखील योगेशने एकतर्फी प्रेमातून फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटून लग्नाची मागणी घातल्याचे या प्राध्यापिकेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराने महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-VIDEO : पुतण्याचा मोबाईल पळवणाऱ्या चोरट्याचा पाठलाग बेतला काकाच्या जीवावर !

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES