• A
  • A
  • A
टिप्पर गँगकडून माजी नगरसेवकाला ठार मारण्याची धमकी

नाशिक - टिप्पर गँगकडून माजी नगरसेवक मामा ठाकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात मामा ठाकरे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


माजी नगरसेवक बळीराम रामभाऊ ठाकरे (मामा ठाकरे) यांचे शुभम पार्क परिसरात स्टँडर्ड वाईन शॉप नावाचे दुकान आहे. निखिल बाळू पगारे याने दुकानात येऊन दारूच्या २ बाटल्या घेतल्या. दुकानातील कर्मचाऱ्यांनी पैशांची विचारणा केली असता निखिल पगारे याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत धमकी दिली. हा प्रकार मामा ठाकरे यांना कळताच त्यांनी निखिल पगारे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी पगारे यांनी, 'तू मला ओळखत नाही का? मी टिप्पर गँगचा माणूस आहे. तुला धंदा करायचा असेल तर ताबडतोब १ लाख रुपये पाठवून दे, नाहीतर तुझा गेम करून टाकेन' अशी धमकी दिली. यानंतर मामा ठाकरे यांनी अंबड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संशयित निखिल पगारे यांच्या विरोधात तक्रार दिली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे करीत आहेत.
हेही वाचा - पुण्यात शेतातील चाऱ्याची वळई जळून खाक, जनावरांवर उपासमारीची वेळ
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही व्यापारी, व्यवसायिकांकडे कोणीही धाक अथवा धमकी देऊन खंडणी मागत असेल तर सबंधितांनी घाबरून न जाता अंबड पोलिसांशी संपर्क साधावा, अशा गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES