• A
  • A
  • A
आडगाव शिवारात आढळला बिबट्याचा संशयास्पद मृतदेह

नाशिक - आडगाव शिवारातील स्मशानभूमीच्या एका ओहळाजवळ सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरातून जाणाऱ्या काही नागरिकांना हा बिबट्या मृतावस्थेत दिसल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. या बिबट्याच्या अंगावरचे कातडे काढण्याचा प्रयत्न केला असून, सदरचा बिबट्या हा कोणीतरी अन्य ठिकाणी मारून आडगाव शिवारात आणून टाकल्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.


वनविभागाच्या पथकाने बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. बिबट्याचा अपघात नसून घातपात करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. बिबट्याची माहिती समजताच काही वन्यजीव प्रेमी संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी देखील हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.


बिबट्याच्या मृत्युचे खरे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. मृतदेहावर कुठेच जखम नसून केवळ पाठीवरून काही प्रमाणात कातडी काढल्याचे दिसते. त्यामुळे अंधश्रद्धेपोटी बिबट्याचा बळी दिला का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
आठवड्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात बिबट्याची कातडी विक्री करताना एकास वनविभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले होते. तर या बिबट्याची कातडी शाबूत असून वाहनांच्या धडकेत बिबट्या घसरला गेल्याने केवळ पाठीवरून केस निघाले आहे. किडनीच्या भागात जोरात आघात झाला असून अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बिबट्या मृत्युमुखी पडल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. तरी देखील शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येऊ शकेल.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES