• A
  • A
  • A
नाशिकमधील आदिवासी वसतिगृहात निकृष्ट जेवण, कंत्राटदार बदलण्यासाठी विद्यार्थ्यांचे उपोषण

नाशिक - परिस्थिती नसताना शिक्षणाची कास धरलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृहात देखील हेळसांड सुरू असल्याचे चित्र नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. पेठरोड भागातील एकलव्य आदिवासी वस्तीगृहात निकृष्ट जेवण मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी उपोषण करत आंदोलन सुरू केले आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून मिळत असलेल्या जेवणामुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याबाबत अनेक वेळा आदिवासी विभागाला निवेदन देऊन सुद्धा यावर तोडगा निघत नसल्याने थेट वसतीगृहाबाहेर उपोषण करत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या वसतिगृहात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय आदिवासी विभागातर्फे करण्यात आली आहे.

हेही वाचा- नाणे न स्वीकारणाऱ्या बँक व्यवस्थापकासह रोखपालवर गुन्हा दाखल

विद्यार्थ्यांनी सांगीतल्यानुसार टाटा कंपनीला आदिवासी विभागाने येथील स्वंयपाकाचे कंत्राट दिले आहे. तर येथील चपात्या या मशीनने बनविण्यात येतात त्यामुळे अनेक वेळा कच्च्या चपात्या खाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. तसेच निकृष्ट दर्जाचे वरण आणि भात मिळत असून जेवणात पालेभाज्या देखील मिळत नसल्याचे विदार्थ्यांचे म्हणणे आहे. येथील स्वंयपाकाचे कंत्राट बदलून हताने बनविण्यात येणाऱ्या (हॅन्ड मेड) चपात्या मिळव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

हेही वाचा- राष्ट्रीय महामार्गामुळे शेतकरी कोट्यधीश, पैशांसाठी नातेवाईक आले जवळ

आदिवासी विभाग आमच्या शिक्षणावर करोडो रुपये खर्च करते मात्र प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या कंत्राटदारांसोबत असलेल्या साट्यालोट्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES