• A
  • A
  • A
नाशिकमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

नाशिक - गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या २ संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. देवळाली कॅम्प इथे गुन्हे शाखेने कारवाई करत ६५ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांना नाशिक रोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीचे आदेश दिले.


हेही वाचा - नाशिकमध्ये ऊस तोडणीवेळी आढळली बिबट्याची पाच पिल्ले
पोलिसांच्या माहितीनुसार दोन्ही संशियत गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक बलराम पालकर यांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. यात एका कारच्या तपासणीत २ प्लॅस्टिकच्या गोणीत ६५ किलो गांजा मिळून आला. या प्रकरणी संशयित मंगेश भगत, राहुल भुजबळ (रा. पंचवटी) यांना अटक केली. यांच्या विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा व कोटपा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ यांच्यासह निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, वसंत पाडव, रवींद्र बागुल, शिवाजी महाले, गणेश वडजे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा - पठावे दिगर येथे विवाहित प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
पंचवटी परिसरात ४ महिन्यांपूर्वी झालेल्या २ कारवाईमध्ये एक कोटीचा गांजा जप्त करण्यात आला होता. देवळाली कॅम्पमध्ये केलेल्या कारवाईत संशियतामध्ये पंचवटीमधील एकाचा समावेश आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यानुसार पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा - प्रिय आबा, पत्रास कारण की.. 'बारमधल्या त्या अंधाराच्या गर्भात'

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES