• A
  • A
  • A
नाशिकमध्ये ऊस तोडणीवेळी आढळली बिबट्याची पाच पिल्ले

नाशिक - नाशिक रोड येथील पळसे भागात एका शेतकऱ्याच्या शेतात बिबट्याची पाच पिल्ले आढळली. ऊस तोडणीवेळी कामगारांना बिबट्याची पिल्ले आढल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा - पठावे दिगर येथे विवाहित प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार पळसे परिसरात भाऊसाहेब गायधनी यांच्या शेतात उसाची तोडणी सुरू होती. याप्रसंगी ऊस तोडणी कामगारांनी ऊस तोडत असताना बिबट्याची पाच पिल्ले आढळून आली. यावेळी पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी तत्काळ वन विभागाला याची माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वन अधिकाऱ्यांनी नागरिकांना पिल्लांना हात न लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच या ठिकाणी पिंजरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या दिवशी ऊस तोड बंद ठेवण्यास सांगितले आहे. रात्रीतून मादी पिल्लांना घेऊन जाईल तसेच मादीला जेरबंद करण्यात येईल, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - प्रिय आबा, पत्रास कारण की.. 'बारमधल्या त्या अंधाराच्या गर्भात'

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES