• A
  • A
  • A
भुजबळांनी पतंगाला दिली ढिल, येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांचा पतंग काटणार का?

नाशिक - येवला येथे देशदूत वृत्तपत्र आयोजित पतंग महोत्सवात माजी उपमुख्यमंत्री आणि येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी पतंग उडवून आनंद साजरा केला. मात्र, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भुजबळ विरोधकांचा पतंग काटणार का? याबाबत येवलेकरांमध्ये चर्चा रंगली आहे.


येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकसाठी सक्षम उमेदवार मिळाला नाही तर भुजबळांच्या परिवारातील सदस्य ही निवडणूक लढवेल, असे संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहे. यासाठी माजी खासदार समीर भुजबळ, शेफाली समीर भुजबळ आणि स्वतः छगन भुजबळ यातील एक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - २ कोटींची खंडणी मागणारे खंडणीखोर ४ तासात जेरबंद
समीर भुजबळांनी तर यासाठी तयारी सुरू केल्याचे चित्र बघायला मिळत आहे. समीर भुजबळ यांच्या तालुका स्तरावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहे. तसेच आता झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन सभेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात समीर भुजबळांचे ब्रँडिंग केल्याचे दिसून आले. यावेळी त्यांचे बॅनरवर फोटो, सभेतील भाषण आणि राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून समीर भुजबळांना मिळाली शाबासकी याद्वारे स्पष्ट संकेत दिले जात आहे.

हेही वाचा - नाशिकमध्ये तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कांद्याच्या ढिगाऱ्यावरच घेतले विष

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES