• A
  • A
  • A
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक वाढल्याने दर कमी

नंदुरबार - शेजारील मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक वाढली. आवक वाढल्याने मिरचीचे दरही कमी झाले आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत कमी भावात मिरची विकावी लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.


देशातील सर्वात मोठे मिरचीचे केंद्र असलेल्या आंध्र प्रदेशातील गुंटूर येथेही प्रचंड मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक होत असल्याने नंदुरबारच्या मिरचीला कमी दर मिळत आहेत. त्यामुळे नंदुरबार येथील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दुष्काळी परिस्थिती असतानाही यंदा १ लाख ३० हजार क्विंटल लाल मिरचीची आवक झाली आहे. ही अतिरिक्त मिरची गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून नंदुरबार येथे विक्रीसाठी येत आहे.
हेही वाचा - कापूस खरेदीत ५ वर्षातील निचांक; हंगामात केवळ २२ हजार क्विंटल खरेदी
याचा फटका मात्र नंदुरबार जिल्ह्यातल्या स्थानिक शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्ह्यात मिरचीच कमी उत्पन्न झालेला असतानाही स्थानिक शेतकऱ्यांना योग्य दर मिळू शकत नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहेत. विशेष म्हणजे यंदा मिरचीचे दर १ हजार ८०० ते २३०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत.
हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील स्ट्रॉबेरी पिकाची यशस्वी शेती

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES