• A
  • A
  • A
कापूस खरेदीत ५ वर्षातील निचांक; हंगामात केवळ २२ हजार क्विंटल खरेदी

नंदुरबार - जिल्ह्यातील बाजार समितीच्या खरेदी केंद्रात यंदाच्या वर्षी केवळ २२ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. खरेदी केंद्रातील ही मागील ५ वर्षातील सर्वात कमी आवक आहे. दरम्यान, आणखी किमान १५ दिवस दिवस कापूस खरेदी सुरू राहण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम कापूस उत्पादनावर झाल्याचे दिसत आहे. यंदाच्या वर्षी कापूसला प्रतिक्विंटल ५,८०० रुपये इतका भाव मिळाला आहे.


हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील स्ट्रॉबेरी पिकाची यशस्वी शेती
यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे खरीपाच्या इतर सर्वच पिकांसोबत कापूस पिकालाही मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सरासरी ९० हजार हेक्टर आहे. ही सरासरी गेल्या ५ वर्षापासून कमी कमी होत गेली आहे. एकुण खरीप क्षेत्राच्या ४० ते ४५ टक्के क्षेत्रावर केवळ कापूस हेच पीक असते. मात्र, यंदाच्या वर्षी कापूस उत्पादनात घट पाहायला मिळाली.


हेही वाचा - डॉ.भोयेंवरील विनयभंगाचा आरोप खोटा, गुन्हा मागे घ्या - कर्मचारी संघटना

यंदाच्या वर्षी अनियमित आणि अत्यल्प पजर्न्यमान यामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. कापूस उत्पादन कमी झाले असले तरी भाव मात्र, अपेक्षीत मिळू शकला नाही. आता कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही भाव वाढ होत नसल्यामुळे साठवलेला कापूस शेतकऱ्यांना कमी किमतीत विक्री करावे लागत आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES