• A
  • A
  • A
चिखली पुनर्वसन वसाहतीतील वास्तव, एक स्पेशल रिपोर्ट

नंदुरबार - सरदार सरोवरामुळे विस्थापित होणाऱ्या परिवाराच्या पुनर्वसनासठी नंदूरबार जिल्ह्यात पुनर्वसन वसाहती उभारण्यात आल्यात. मात्र, त्यांचा किती उपयोग विस्थापित लोकांना होतो हा एक प्रश्न आहे. शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन वसाहतीतील वास्तव सांगणारा एक स्पेशल रिपोर्ट...


नर्मदा नदीच्या काठावरील गावातील कुटुंबांना सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित व्हावे लागले. अशा गावातील काही कुटुंबांसाठी चिखली पुनर्वसन वसाहत निर्माण करण्यात आली आहे. वसाहत बनवत असताना नर्मदा विकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी शाळेची टोलेजंग इमारत उभारली. मात्र, गेल्या ८ ते १० वर्षांपासून ती इमारत तशीच धूळ खात पडली आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वसाहतीत कोट्यावधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या शाळेचा उपयोग काय? असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करतात.
हेही वाचा-नवापूर तालुक्यातील रायंगण गावाजवळील पूल वाहनचालकांसाठी बनलाय मृत्यूचा सापळा
ज्या प्रमाणे शाळेची फक्त इमारत उभी आहे त्याच प्रमाणे आरोग्य केंद्राच्या इमारतीची अवस्था आहे. वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून या ठिकाणी आरोग्य उपकेंद्राची इमारत आहे. मात्र, यात कधी डॉक्टर फिरकला नाही.

इतक्यावर या पुनर्वसन वसाहतीच्या समस्या संपत नाही याठिकाणी अंगणवाडीची इमारत नाही. अगोदर अंगणवाडी सेविकांच्या झोपडीत भरत होती तिला सामजिक सभागृहात भरविण्याचा आदेश झाला. मात्र, या सभागृहात कार्यक्रम, मीटिंग सुरू आसतात. तेव्हा अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांची सोय कुठे करावी, असा प्रश्न अंगणवाडी सेविकेला पडतो.
हेही वाचा- डॉ.भोयेंवरील विनयभंगाचा आरोप खोटा, गुन्हा मागे घ्या - कर्मचारी संघटना

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES