• A
  • A
  • A
नवापूर तालुक्यातील रायंगण गावाजवळील पूल वाहनचालकांसाठी बनलाय मृत्यूचा सापळा

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील रायंगण गावाजवळील पूल वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास साक्री येथील शरद ठाकरे हे नवापूरकडे मोटरसायकलने जात असताना त्यांच्या वाहनाला ट्रकचालकाने धडक देत ठाकरे यांच्या अंगावरून ट्रक भरधाव वेगाने चालवून नेत ट्रकचालक फरार झाला आहे. या परिसरातील आणि रायगण गावाजवळील पूलावरील अपघात हे नेहमीचेच झाले आहेत.


या अपघातात शरद भटू ठाकरे यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथील १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर गुंतीलाल गावित, पायलट लाजरस गावित यांनी तातडीने मदत पुरवली. परंतु शरद ठाकरे यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने जागेवरच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हेही वाचा- राज्य महामार्ग दुरुस्तीत हलगर्जीपणा, काम निकृष्ट होत असल्याचा नागरिकांचा आरोप

राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाचे काम बंद पडले आहे, पर्यायी मार्ग नादुरुस्त असल्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. बेडकी ते कोंडाईबारीदरम्यान महामार्ग प्राधिकरणाकडून ९३ लाखांचा निधी दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आला आहे. परंतु अजूनही महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे.
हेही वाचा - मुहूर्ताची वाट न पाहता नागरिकांनीच केले उड्डाणपूलाचे अनौपचारिक उद्घाटन
महामार्ग प्राधिकरणाद्वारे या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी वाहनचालकांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. सदरील प्रकरणाचा तपास नवापूर पोलीस करीत आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES