• A
  • A
  • A
प्रियंका गांधीनी पहिली राजकीय सभा नंदुरबारमध्ये घ्यावी - आमदार के. सी. पाडवी

नंदूरबार - नुकतेच काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांनी आपली पहिली राजकीय सभा नंदुरबार जिल्ह्यात घ्यावी, अशी मागणी आमदार के. सी. पाडवी यांनी केली आहे. याबाबत पाडवी यांनी राहुल गांधी यांना पत्रही लिहिले आहे.


हेही वाचा -'प्रियंका गांधी यांना नागपुरातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी'
इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात नंदुरबारपासून केली आहे. त्यामुळे प्रियंका गांधींनीही नंदुरबारमध्ये सभा घ्यावी, अशी विनंती आमदार पाडवी यांनी केली आहे. विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव हे प्रियंका गांधी यांच्याकडे इंदिरा गांधींप्रमाणे पाहात असल्याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.

हेही वाचा -राज्यात काँग्रेसकडून प्रियांका, राहुल गांधींच्या सभांची तयारी
प्रियंका गांधींनी पहिली सभा नंदुरबारमध्ये घेतली, तर केंद्रात काँग्रेस सत्ता स्थापन केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही राहुल गांधी यांना लिहिलेल्या विनंती पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. इंदिरा गांधींनी घेतलेल्या पहिल्या प्रचार सभेचा उल्लेख या पत्रात करण्यात आला असून गांधी परिवाराशी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव मनापासून जोडला असल्याचे आमदार पाडवी यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा -महासचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका पहिल्यांदाच...


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES