• A
  • A
  • A
वाहतूक पोलिसाचा लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

नंदूरबार - नागपूर सुरत महामार्गावर नंदुरबार-धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कोंडाईबारी घाटात महामार्ग पोलिसांची चौकी आहे. या महामार्गावर होणाऱ्या अपघात समयी मदत करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी २४ तास महामार्ग पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या चौकीच्या बाहेर नियुक्त असलेले पोलीस कर्मचारी रस्त्यावर बॅरिकेट्स लावून येणारी वाहने अडवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसुल करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


हेही वाचा-नंदुरबारमधील वीरमरण आलेल्या मिलिंद खैरनार यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण
या वसुलीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. त्याची तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याने एका ट्रक चालकाने या वसुलीचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला आहे.
या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात त्यांच्याकडून लाखोंची वसुली केली जाते. त्यामुळे गृहमंत्रालय आणि लाचलुचपत विभागाचे अधिकारी कारवाई का करत नाहीत? हा प्रश्न आहे.

हेही वाचा-अक्कलकुवा तालुक्यात साडेनऊ लाखांची अवैध दारू जप्त, ६ जणांवर कारवाई


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES