• A
  • A
  • A
नंदुरबारमधील वीरमरण आलेल्या मिलिंद खैरनार यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण

नंदुरबार - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या मिलिंद खैरनार यांच्या भव्य स्मारकाचे त्यांच्या मूळ गावी नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे येथे लोकार्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या भव्य स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.


जवान मिलिंद खैरनार हे गरुड कमांडो होते. सैन्य दलातील या विशेष तुकडीत कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांचे या बलिदानाने देशाला नेहमी प्रेरणा मिळावी आणि देशसेवेची परंपरा अशीच सुरू राहावी, यासाठी हे स्मारक उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने हे स्मारक उभारण्यात आले असून अत्यंत विस्तृत आणि आखीव-रेखीव पद्धतीने त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
हेही वाचा - प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन
जम्मू-काश्मीर येथील बंदीपुरा या भागात अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. त्यात मिलिंद हे गंभीर जखमी झाले होते. मात्र, रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यांनी देश सुरक्षेसाठीच्या ६ प्रमुख मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES