• A
  • A
  • A
अक्कलकुवा तालुक्यात साडेनऊ लाखांची अवैध दारू जप्त, ६ जणांवर कारवाई

नंदुरबार - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोलगी तालुका अक्कलकुवा येथे अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या ६ जणांवर कारवाई करून ९ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोलगी येथील संतोषी माता मंदिर परिसरात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाल्या होत्या.


हेही वाचा -अनोखा विवाह : संविधानाची प्रत भेट देऊन वऱ्हाडी मंडळीचे स्वागत
या तक्रारींची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करत घरात लपवून ठेवलेला मध्यप्रदेश बनावटीचा अवैध मद्य साठा घराचे कुलूप तोडून ताब्यात घेतला. राज्य उत्पादन शुल्क विभाग गेल्या आठवड्यापासून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करत आहे. असे असले तरी याच विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. छोट्या माशांवर कारवाई करून मोठ्या दारू तस्करांना राज्य उत्पादन शुल्क विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
हेही वाचा -प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES