• A
  • A
  • A
अनोखा विवाह : संविधानाची प्रत भेट देऊन वऱ्हाडी मंडळीचे स्वागत

नंदुरबार - जिल्ह्यातील शहादा येथे अशोक बच्छाव यांनी एक अमूल्य भेट देत विवाह सोहळा केला आहे. आपल्या मुलीच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना राज्य घटनेची प्रत भेट देऊन पाहुणे मंडळींचा सत्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेले संविधान प्रत्येक घरात पोहचले पाहिजे म्हणून त्यांनी आलेल्या पाहुणे मंडळीला संविधान भेट दिले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि वाचनालयाला संविधानाची प्रत भेट देणार आहेत.


हेही वाचा - शहादा नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण
लग्न सोहळा म्हटले, की त्यात हौस मौज पूर्ण करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्यात सनई चौघडे आदी गोष्टी येतात. मात्र, आपल्या मुलीच्या लग्नात लोकशाही मूल्य आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असलेल्या संविधानची भेट देऊन एक नवा पायंडा पाडला आहे. तो नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील अशोक बच्छाव यांनी ज्या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली. जीवन जगण्याचा अधिकार दिला ते संविधान देशातील प्रत्येक नागरिकाच्या घराघरात असावे, त्यातून आपल्याला आपले हक्क आणि जीवन जगण्याचे मार्ग सापडतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान प्रत्येक नातेवाईकाकडे आणि मित्रांकडे असावे अशी भावना अशोक बच्छाव यांची होती. त्यातून त्यांनी आपली मुलगी प्रसन्ना तिच्या लग्न सोहळ्यात आलेल्या पाहुणे मंडळीला आणि पाहुण्यांना संविधानाची प्रत भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासोबत जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आणि वाचनालयात तरुण पिढीला आपले हक्क यांची जाणीव हवी त्यासाठी त्यांनी संविधानाच्या प्रति भेट भेट म्हणून दिले आहेत.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये आदिवासी टायगर सेनेचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES