• A
  • A
  • A
शहादा नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण

नंदुरबार - शहादा नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि प्रस्तावित कामांचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. झालेल्या विकास कामांचा गौरव पालकमंत्र्यांनी केला. यावेळी खासदार हिना गावित, आमदार विजयकुमार गावित, आमदार पाडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


शहराच्या प्रवेश द्वारावर असलेल्या चौकाचे सुशोभिकरण आणि शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या गांधी उद्यानाचे लोकार्पण, त्याच्यासोबत गरीब नवाज केंद्रात पालिकेच्या मार्फत उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. शिवाय शहरातील नवीन वस्तीत असलेले रस्ते आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेच्या संदर्भातील योजनांचे भूमिपूजन पालक मंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा - शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रथयात्रा
जिल्ह्यातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी ३६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी लागणारा निधी लोकसहभागातून उभारला जात आहे. कमी पडणारा निधी राज्य सरकार देईल, शहादा शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पालकमंत्री जयकुमार रावल यावेळी म्हणाले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES