• A
  • A
  • A
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकरी परिषदेचे आयोजन

नंदुरबार - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्या वतीने शहरातील इंदिरा गांधी मंगल कार्यालयात दुष्काळग्रस्त शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत वेगवेगळ्या प्रकारचे १३ ठराव मांडण्यात आले. सरकार दुष्काळी भागात कसल्याही प्रकारचे उपाययोजना करताना दिसून येत नसल्याचा आरोप या दुष्काळी परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केला.


या दुष्काळ परिषदेत २ हजारांपेक्षा अधिक शेतकरी उपस्थित होते. दुष्काळ अस्मानी संकट असले तरी शासन निर्मित सुलतानी संकटांमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतर केले आहे. तरीही अनेक भागात अजूनही रोजगार हमीची कामे सुरू झाले नाहीत. पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना झाल्या नाही, असे विविध प्रश्न शेतकऱ्यांनी मांडले.

वाचा -गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून हत्याकांडासह जाळपोळ सुरूच; ७ वाहने पेटवली
आदिवासी शेतकऱ्यांना वन जमिनी मिळाल्या आहेत. त्यांचे सपाटीकरण रोजगार हमी योजनेतून करण्यात यावे. दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करण्यात याव्या. यासह विविध प्रकारचे ठराव या दुष्काळी परिषदेत मांडण्यात आले. यावेळी राज्याच्या नियोजन समितीचे माजी सदस्य अर्थतज्ज्ञ एच. एम देसर्डा, किशोर ढमाले रामसिंग गावित नजुबाई गावित यांच्यासह सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचा - केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशन: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सुरुवात

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES