• A
  • A
  • A
अतिक्रमण विभागाची अरेरावी..वृद्ध दाम्पत्याची झोपडी जमीनदोस्त, अपंग मुलाची औषधेही घेतली ताब्यात

जळगाव - महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा हेकेखोरपणा समोर आला आहे. माजी महापौरांनी केलेल्या तक्रारीचे कारण पुढे करत अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज सकाळी एका वृद्ध दाम्पत्याचे संसारोपयोगी साहित्य जप्त करून थेट महापालिकेत आणले. यावेळी वृद्ध दाम्पत्याच्या अपंग मुलाची औषधी, तीनचाकी सायकल देखील अतिक्रमण विभागाच्या पथकाने बळजबरीने ताब्यात घेतली. धनदांडग्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या निर्दयी कारवाईबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केले जात आहे.


शहरातील शिवाजीनगर भागात राहणारे विठ्ठल बाबुराव तळोकार व गीता तळोकार या वृद्ध दाम्पत्याच्या झोपडीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. तळोकार दाम्पत्याची शिवाजीनगर उड्डाणपूल परिसरात झोपडी होती. काही दिवसांपूर्वी या परिसरात आगीची घटना घडली होती. त्यामध्ये त्यांची झोपडी जळून खाक झाली होती. या दुर्घटनेनंतर उरलेल्या संसारोपयोगी साहित्यासह तळोकार दाम्पत्य रस्त्यावर राहत होते. पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी त्यांनी तहसीलदारांकडे मदत मागितली होती. मात्र, पुनर्वसन होईपर्यंत त्या ठिकाणी थांबण्याचे त्यांना सांगितले गेले. त्यानुसार ते उघड्यावर राहत होते.

हेही वाचा - देऊळवाडा येथे शेतकऱ्यांवर बिबट्याच्या हल्ला, ३ जखमी
दरम्यान, त्यांच्या वास्तव्याविरोधात माजी महापौर असलेल्या व्यक्तीने अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज सकाळी तळोकार दाम्पत्याचे संसारोपयोगी साहित्य बळजबरीने जप्त करून महापालिकेच्या आवारात आणले. या कारवाईवेळी तळोकार यांचा अपंग मुलगा तेथे हजर होता. त्याने विनवण्या केल्या. मात्र, पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याचे ऐकून घेतले नाही. उलट त्या अपंग मुलाची तीनचाकी सायकल, गोळ्या-औषधी देखील हिसकावून घेतल्या. काही वेळेनंतर तळोकार दाम्पत्य परत आले असता त्यांना कारवाईची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. रडत रडत त्यांनी महापालिका गाठली.
हेही वाचा -गितांजली एक्स्प्रेसला आग; जीवितहानी नाही
दाम्पत्याचा मुलगा अपंग व मानसिक रुग्ण -
तळोकार दाम्पत्याचा मुलगा हा अपंग आहे. शिवाय तो मानसिक रुग्ण देखील आहे. त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरू आहेत. अतिक्रमण विभागाने संसारोपयोगी साहित्य नाही दिले तरी चालेल. मात्र, मुलाची औषधी परत करण्याची विनवणी त्यांनी केली. महापालिकेच्या आवारात आणून टाकलेल्या साहित्यात ते औषधींची शोधाशोध करत होते. त्याच वेळी आमदार सुरेश भोळे आणि नगरसेवक कैलास सोनवणे तेथे दाखल झाले. त्यांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही संताप व्यक्त केला. आमदार सुरेश भोळे यांनी अतिक्रमण विभागप्रमुख एच. एम. खान यांना तेथे बोलावून त्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर वृद्ध दाम्पत्याला पैसे देऊन त्यांचे साहित्य परत पाठविण्याची व्यवस्था केली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES