• A
  • A
  • A
जागा वाटपाचा निर्णय पदाधिकाऱ्यांचा, आपण कशाला डोक्याला ताप घ्यायचा - एकनाथ खडसे

जळगाव - भाजपच्या खान्देशातील चारही जागा सुरक्षित आहेत. एकाही जागेला धक्का लागेल अशी परिस्थिती नाही. कुणी इकडे येऊ द्या, तिकडे जाऊ द्या काही फरक पडत नाही. याला तिकीट मिळेल, त्याला मिळेल ही चर्चा सुरू आहे. पण जागा वाटपाचा निर्णय पदाधिकाऱ्यांचा आहे. आपण कशाला डोक्याला ताप घ्यायचा. आपले काम सैनिकासारखे आहे. सेनापती सांगेल त्या दिशेने जायचे, अशा शब्दात माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुख संमेलनात ते बोलत होते.


खडसे पुढे म्हणाले की, काहीही नसताना आपण या ठिकाणी ४ जागा टिकवून ठेवल्या. भाजप-सेना युती असताना आपण खान्देशात ५ जागा ताब्यात घेतल्या. हे काही पदाधिकारी किंवा नाथाभाऊंमुळे झाले नाही तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने शक्य झाले. कार्यकर्ता प्रामाणिकपणे गावपातळीवर काम करतो, प्रत्येक मतदारापर्यंत पोहचतो तेव्हा हे शक्य होते. आज आपल्या कोणत्याही जागेला धक्का लागेल अशी परिस्थिती नाही. विरोधकांकडे उमेदवार नाहीत. आपल्या दोन्ही खासदारांसमोर कोण उभे राहू शकत सांगा. आपल्यातले असतील ते सोडा पण विरोधकांकडे नाहीत. तेव्हा अंग झटकून कामाला लागा. तुमची ताकद दाखवून द्या, असे आवाहन खडसेंनी कार्यकर्त्यांना केले.
वाचा- राम मंदिरसाठी न्यायालयाच्या निर्णयाची गरज नाही - सुब्रमण्यम स्वामी
या संमेलनाला जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ विस्तारक उपस्थित होते. या सर्वांच्या कामांचा आढावा पदाधिकाऱ्यांनी घेतला. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू व रामदास अंबटकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची काय रणनीती आहे, याबाबत सविस्तर माहिती देत कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले. या संमेलनासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, माजीमंत्री एम. के. पाटील, विजयकुमार गावित, खासदार ए. टी. पाटील, रक्षा खडसे, हिना गावित, आमदार हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, संजय सावकारे उपस्थित होते.

वाचा - गेम खेळताना मोबाईलचा स्फोट; ८ वर्षीय बालकाचा हात निकामीCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES