• A
  • A
  • A
दलाली ही काँग्रेसची कार्यपद्धती, सुभाष भामरेंचा काँग्रेसवर निशाणा

जळगाव - दलाली घेतल्याशिवाय कोणतीही डील होऊ द्यायची नाही, ही काँग्रेसची कार्यपद्धती आहे, असे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटले आहे. जळगावात भारतीय जनता पक्षाच्या शक्ती केंद्रप्रमुख संमेलनात ते बोलत होते. आधी आमच्या पोतड्या भरू द्या, देशाची संरक्षण व्यवस्था खड्यात गेली, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.


भामरे म्हणाले, राफेल विमान खरेदी करण्याची देशाला गरज होती. पण, २००१ ते २०१३ पर्यंत काँग्रेसची सत्ता असतानाही त्यांनी कोणाची वाट पाहिली ? त्यांना कुणी अडविले होते, असा प्रश्नही भामरेंनी विचारला. २००१ ते २००१ पर्यंत काँग्रेसने वेळकाढूपणा केला. २००७ मध्ये राफेल विमान खरेदी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण ती कोणाकडून घ्यावी यासाठी २०१२ पर्यंत वेळ घालवला.

हेही वाचा - पडघम लोकसभा निवडणुकीचे : जळगावात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात, शह काटशहाला वेग

२०१४ - १५ मध्ये जेव्हा भाजपची सत्ता झाली, तेव्हा हवाई दलाकडून सतत सांगितले जात होते, की भारताच्या पाकिस्तान आणि चीन सीमेवर तणाव सदृश्य परिस्थिती आहे. दोन्ही ठिकाणी दहशतवादी कारवाया सुरू आहेत. अशा तणावाच्या परिस्थितीत हवाई दलाची ताकद कमी पडायला नको. म्हणून आपल्याकडे अत्याधुनिक विमाने गरजेची आहेत. म्हणूनच भाजपने तातडीने फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीकडून राफेल विमाने खरेदीचा निर्णय घेतला. तो अत्यंत पारदर्शक आहे. परंतु काँग्रेस पक्षाचे नेते खोटे बोलून देशाची दिशाभूल करत आहेत, असे सुभाष भामरे यांनी सांगितले. अंबानी यांच्या कंपनीचा यात कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - तरुणांनी नवीन सर्जनशील कल्पना विकसित कराव्यात - मुकुंद करंजीकर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात रविवारी दुपारी भाजपच्यावतीने शक्ती केंद्र प्रमुख संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या संमेलनाला भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, राज्याचे पर्यटन विकास तथा रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे, नंदुरबारच्या खासदार हिना गावित, रावेरच्या खासदार रक्षा खडसे, जळगावचे खासदार ए. टी. पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, सुरेश भोळे, माजी मंत्री विजयकुमार गावीत उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES