• A
  • A
  • A
तरुणांनी नवीन सर्जनशील कल्पना विकसित कराव्यात - मुकुंद करंजीकर

जळगाव - उद्योजक होण्यासाठी आपल्याकडील रुढ भ्रामक कल्पना दूर करून तरुणांनी आपल्या नवीन सर्जनशील कल्पना विकसित कराव्यात, असे आवाहन अमेरिकेतील सुप्रसिध्द भारतीय उद्योजक डॉ. मुकुंद करंजीकर यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २७ व्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.


समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु पी.पी. पाटील होते. डॉ. करंजीकर यांनी यावेळी 'उद्योजकता आणि भारतीय तरुण' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की भारतात उद्योजक होण्यासाठी तरुणांना मोठी संधी आहे. देशाची ५० टक्के लोकसंख्या २५ वर्ष वयोगटाच्या आत आहे. उद्योजक होणे म्हणजे केवळ नवीन व्यवसाय सुरू करणे असे नव्हे, तर नवनवीन कल्पना आणि त्या कल्पनांचा सामाजिक उपयोग आवश्यक आहे. परंपरागत विचार न करता नाविन्यपूर्ण विचार करण्याची गरज आहे. नोकरी न करता नोकरी देणारे व्हा, असे आवाहन करताना डॉ. करंजीकर यांनी देशातील जुन्या आणि नवीन प्रतिमानांचा उल्लेख केला.
हेही वाचा -पडघम लोकसभा निवडणुकीचे : जळगावात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात, शह काटशहाला वेग
श्रीमंत विरुध्द गरीब आणि काहींना प्राप्त झालेले विशेषाधिकार विरुध्द विशेषाधिकार नसलेल्या व्यक्ती ही जुनी प्रतिमाने झाली आहेत. आताच्या युगात ज्ञान विरुध्द अज्ञान, ज्ञानाचे झालेले लोकशाहीकरण, ज्ञान व उद्योजकता यामुळे समाजाची होत असलेली भरभराट ही नवीन प्रतिमाने उदयाला आली आहेत. उद्योजक होण्यासाठीच्या रूढ असलेल्या भ्रामक कल्पनांचा उल्लेख करताना ते म्हणाले, की उद्योजक हा मूलत: जन्माला येत असतो. रात्रभरातून यश प्राप्त होते किंवा भाषा हा उद्योजक होण्यासाठी अडथळा आहे. संसाधने नसलेल्या वातावरणात उद्योजक होणे शक्य नाही, अशा काही भ्रामक कल्पना दूर सारण्याची गरज आहे. भारतातील सांस्कृतिक परंपरेचा उल्लेख करताना ते म्हणाले, की अध्यात्म ही जुनी संस्कृती आहे. अहम्ं ब्रम्हास्मी, कर्मसिध्दांत आणि मानवी गुणधर्म यावर विश्वास ठेवा. उद्योजक होण्यापूर्वी आपला कल ओळखा, व्यवसायाचे मॉडेल निश्चित करा. त्यासाठी सल्लागार शोधा, मेहनतीची तयारी ठेवा. अपयश आले तरी सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा -बोल मैं हलगी बजाऊ क्या! थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी जळगाव महापालिकेचा फंडा
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु पी. पी. पाटील यांनी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेतला. नामविस्तारानंतर हा पहिलाच दीक्षांत समारंभ असल्यामुळे या समारंभाला एक वेगळे महत्त्व आहे असे सांगून खानदेशातील तरुणांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यात ज्ञानाची अखंड ज्योत पेटवत त्यांच्या पायावर समर्थपणे उभे करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न अव्याहतपणे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
९० विद्यार्थ्यांना सुवर्णपदक-
यावेळी गुणवत्ता यादीतील ९० विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदके देण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशुतोष पाटील, डॉ. विजयप्रकाश शर्मा व प्रा. सुरेखा पालवे यांनी केले. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा. पी. पी. माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा. एस. टी. इंगळे, प्राचार्य एल.पी. देशमुख, प्राचार्य डी.एस. सूर्यवंशी, प्रा. नितीन बारी, प्रा.मोहन पावरा, डॉ.सुभाष चौधरी, दीपक पाटील, विवेक लोहार, डॉ. जितेंद्र नाईक, डॉ. प्रिती अग्रवाल, डॉ. प्रशांत कोडगिरे उपस्थित होते. या पदवीप्रदान समारंभात ३८ हजार ९१२ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १५ हजार ६३१ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४ हजार ४६६ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे १७ हजार ७८८ आणि आंतर विद्याशाखेचे १०५७ स्नातकांचा समावेश आहे. तसेच २५१ पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES