• A
  • A
  • A
बोल मैं हलगी बजाऊ क्या! थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी जळगाव महापालिकेचा फंडा

जळगाव - थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी जळगाव महापालिकेने अनोखा फंडा अवलंबला आहे. वर्षानुवर्षे मालमत्ताकर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्या घरांसमोर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी हलगी वाजवून थकीत रक्कम भरण्याचे आवाहन केले. महापालिकेने लढवलेल्या शक्कलमुळे बदनामीच्या भीतीपोटी दिवसभरात ३२ थकबाकीदारांनी आपल्याकडे थकीत असलेली रक्कम तत्काळ भरली. यामुळे शुक्रवारी दिवसभरात महापालिकेच्या तिजोरीत २३ लाख १४ हजार रुपयांची भर पडली.


महापालिकेकडून करवसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत बड्या थकबाकीदारांना लक्ष्य करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाकडून सुरुवातीला शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय ४०० बड्या थकबाकीदारांच्या याद्या चौकाचौकात लावण्यात आल्या होत्या. मात्र, याद्या प्रसिध्द केल्यानंतर देखील थकबाकीदारांनी आपली थकीत रक्कम भरली नव्हती. त्यामुळे महापालिकेकडून सर्व थकबाकीदारांना जप्तीबाबतची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर काही थकबाकीदारांनी रक्कम भरली. परंतु, महापालिकेकडे वसुलीचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी फार काळ शिल्लक नसल्याने आता नवा फंडा अवलंबण्यात आला आहे.
वाचा- अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्काराचे राज्य स्तरावर वितरण
१३ थकबाकीदारांच्या मिळकती जप्त-

घरासमोर हलगी वाजविल्यानंतर देखील थकीत रक्कम न भरणाऱ्या १३ थकबाकीदारांच्या मिळकती महापालिका प्रशासनाकडून जप्त करण्यात आल्या. थकबाकीदारांनी विहीत मुदतीत थकीत रक्कम न भरल्यास त्यांच्या मिळकतींवर बोजा चढविला जाणार आहे. शुक्रवारी ३२ जणांनी थकीत रक्कम भरली असून, यामध्ये सर्वाधिक प्रभाग समिती ४ मधील १० जणांचा समावेश होता. प्रभाग-समिती १ व २ मध्ये प्रत्येकी ७ तर प्रभाग ३ मधील ८ जणांनी थकीत रक्कम मनपाकडे भरली.
वाचा- बीडमधील गर्भपात प्रकरणः तिघे दोषी; डॉक्टर दाम्पत्याला १० वर्षांची शिक्षा
प्रभागनिहाय जमा झालेली थकबाकी-
प्रभाग १ : ७ लाख ४४ हजार ६३१
प्रभाग २ : १ लाख १६ हजार ४२३
प्रभाग ३ : ४ लाख १२ हजार ७७
प्रभाग ४ : १० लाख ४१ हजार ७७९

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES