• A
  • A
  • A
भुसावळ रेल्वे स्थानकावर माथेफिरूचा गोंधळ, मालगाडीवर चढून जिवंत तार पकडण्याचा प्रयत्न

जळगाव - भुसावळ रेल्वे स्थानकावर गुरुवारी एका माथेफिरूने चांगलाच गोंधळ घातला. रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या मालगाडीवर चढून त्याने जिवंत तार पकडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हा प्रकार रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी विद्युत पुरवठा खंडित करून माथेफिरुला खाली उतरवले.


हेही वाचा-राष्ट्रीय महामार्ग ६ चे चौपदरीकरण संथगतीने, अपघातांची संख्या वाढली
संतोषकुमार राजभर असे त्या माथेफिरूचे नाव असून तो मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी आहे. तो मानसिक रुग्ण असल्याचे रेल्वे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गुरुवारी सकाळी फलाट क्रमांक ३ वर एक मालगाडी उभी होती. या गाडीच्या डब्यावर चढून संतोषकुमार याने जिवंत तार पकडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहणाऱ्या प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने आरपीएफच्या जवानांनी धाव घेतली. वेळीच विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे माथेफिरुचा जीव वाचला. या प्रकारामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
रेल्वे पोलिसांनी संतोषकुमार याला ताब्यात घेतले आहे. तो मानसिक रुग्ण असल्याने पोलीस विचारत असलेली माहिती तो नीट देत नव्हता. त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली आहे. मात्र, त्याच्या नातेवाईकांबाबत माहिती मिळाली नाही. तो भुसावळमध्ये कोणत्या कामासाठी आला होता? कुठे जात होता? याची माहिती मिळाली नाही.
हेही वाचा-ऐनपूरला बचत गटाच्या महिलांचे ठिय्या आंदोलन; ग्रामपंचायतीच्या कार्यपध्दतीचा नोंदवला निषेधCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES