• A
  • A
  • A
राष्ट्रीय महामार्ग ६ चे चौपदरीकरण संथगतीने, अपघातांची संख्या वाढली

जळगाव - शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. या महामार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने सातत्याने अपघात होत आहेत. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता महामार्गाचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.


सध्या धुळे जिल्ह्यातील फागणे ते बुलडाणा जिल्ह्यातील चिखली या टप्प्यात जळगाव तालुक्यातील तरसोद ते भुसावळ दरम्यान कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, दुसरीकडे फागणे ते जळगाव दरम्यानचे काम ठप्प आहे. त्यामुळे वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सातत्याने अडथळे येत असल्याने चौपदरीकरण कामाचे त्रांगडे सुरूच आहेत. मध्यंतरी हे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने कामासाठी आवश्यक असलेली बँक गॅरंटीची रक्कम भरली नव्हती. त्यामुळे काम अनेक महिने रखडले होते. आता हा प्रश्न मार्गी लागल्याने कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. परंतु चालू टप्प्यात फक्त तरसोद ते भुसावळ दरम्यान काम सुरू आहे. दुसरीकडे फागणे ते जळगाव दरम्यानचे काम अद्यापही रखडलेच आहे. हे काम देखील सुरू करून जळगाव जिल्ह्यातील मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा - ऐनपूरला बचत गटाच्या महिलांचे ठिय्या आंदोलन; ग्रामपंचायतीच्या कार्यपध्दतीचा नोंदवला निषेध
रहदारी वाढल्याने महामार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे या महामार्गावर सातत्याने अपघात होतात. आरटीओ विभागाच्या आकडेवारीनुसार, या महामार्गावर वर्षाकाठी होणाऱ्या अपघातांमध्ये ३०० पेक्षा अधिक लोकांचा बळी जातो. महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असा अंदाज आहे. महामार्ग चौपदरीकरणाचा विषय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा - भुसावळ ते भादली तिसऱ्या रेल्वे लाईनवर 130 कि. मी. वेगाची चाचणी यशस्वी
जळगाव शहरात समांतर रस्त्यांची प्रतीक्षा कायम-

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नसताना दुसरीकडे याच महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रस्तावित असलेल्या समांतर रस्त्यांची प्रतिक्षा कायम आहे. जळगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या पुलापासून ते भुसावळ रस्त्यावरील कालिंका माता मंदिरापर्यंत हे समांतर रस्ते तयार केले जाणार आहेत. समांतर रस्ते नसल्याने महामार्गावर नेहमी अपघात होतात. महामार्गावर अनेक कंपन्या, शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे दररोज या महामार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत महामार्ग अपुरा पडत असल्यानेच अपघात वाढले आहेत. त्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करण्यासह जळगाव शहरातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्ते तयार करणे आवश्यक आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES