• A
  • A
  • A
ऐनपूरला बचत गटाच्या महिलांचे ठिय्या आंदोलन; ग्रामपंचायतीच्या कार्यपध्दतीचा नोंदवला निषेध

जळगाव - महिला सक्षमीकरणासाठी एकीकडे शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना दुसरीकडे महिलांची परवड होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील ऐनपूर ग्रामपंचायतीने महिला बचत गटाला व्यवसायासाठी दिलेली जागा परत घेतली आहे. त्यामुळे संतप्त १० महिला बचत गटांच्या सदस्य महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन करत ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपध्दतीचा निषेध नोंदवला.


या प्रश्नासंदर्भात गेल्या ७ महिन्यांपासून स्थानिक खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर तसेच प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागूनही प्रश्न सुटत नसल्याने बचत गटाच्या महिला चिडल्या आहेत. ऐनपूर गावात नोंदणीकृत १० बचतगट असून १३० महिला सदस्यांची संख्या आहे. या महिलांकडून व्यवसायासाठी ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र, जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे.
हेही वाचा- प्राध्यापकपदाची नोकरी सोडून दुष्काळात शेती; जळगाव केळी पोहोचवली पाकिस्तानात!
महिलांवर अन्याय-
ग्रामपंचायत प्रशासन महिलांवर अन्याय करत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास' या ब्रिदवाक्याचा काय उपयोग, असेही या आंदोलक महिलांनी म्हटले आहे.
हेही वाचा- भुसावळ ते भादली तिसऱ्या रेल्वे लाईनवर 130 कि. मी. वेगाची चाचणी यशस्वी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES