• A
  • A
  • A
प्राध्यापकपदाची नोकरी सोडून दुष्काळात शेती; जळगाव केळी पोहोचवली पाकिस्तानात!

जळगाव - 'केळीचे आगार' असलेल्या जळगावात दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. अशा स्थितीत जिद्द असेल तर किती यश मिळू शकते, हे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे चांगली प्राध्यापकपदाची नोकरी सोडून त्यांनी केळीची निर्यात पाकिस्तानात करून दाखविली आहे. उज्ज्वल अग्रवाल, असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे.

निर्यातक्षम केळी


हेही वाचा-केंद्र सरकारला पुढील आर्थिक वर्षात आरबीआयकडून हवाय ६९ हजार कोटींचा लाभांश
जिल्ह्यात केळीवर रोगराई पसरल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उज्ज्वल अग्रवाल रावेर तालुक्यातील अटवाडे येथील रहिवासी आहेत. अग्रवाल हे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते. मात्र, लहानपणापासून शेतीची आवड असल्याने त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीची कास धरली. निर्यातक्षम केळी उत्पादित करून ते आज पंचक्रोशीत प्रगतशील तरुण शेतकरी म्हणून परिचित आहेत. निर्यातक्षम केळी उत्पादनात त्यांचा हातखंडा आहे. अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांना ते मार्गदर्शनदेखील करतात.
हेही वाचा-अमेरिका-चीन व्यापारी युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला होणार फायदा
अटवाडे गावालगतच अग्रवाल यांची शेती आहे. त्यांनी आपल्या बागायती शेतीत सुमारे ४० हजार केळीच्या रोपांची लागवड केली आहे. सध्या त्यांच्या शेतातील केळीचे हार्वेस्टिंग सुरू आहे. त्यांच्या शेतात 12 ते 13 फूट वाढलेल्या खोडापासून निर्यातक्षम केळी उत्पादित झाली आहे. त्याचीच पहिली कापणीची तयारी सुरू आहे. खोक्यांमध्ये पॅकींग करून जम्मू काश्मीरमार्गे ही केळी ट्रकने थेट पाकिस्तानात निर्यात करण्यात येणार आहेत.

हेही वाचा-स्टार्टअपवरील एंजेल कराबाबतचा येत्या ४ ते ५ दिवसात निर्णय होणार
८० लाखांचे उत्पन्न अपेक्षित-
बाजारात सध्या निर्यातक्षम केळीला १००० ते १२०० रुपये असा दर मिळत आहे. उज्ज्वल अग्रवाल यांच्या शेतात ४० हजार केळीच्या झाडांपासून प्रतिझाड ८० ते ११० रुपये खर्च वजा जाता त्यांना प्रतिझाड दीडशे ते दोनशे रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. त्यांना सरासरी ८० लाख रुपयांचे उत्पन्न या केळीपासून मिळणार आहे.

होतकरू शेतकऱ्यांसाठी अग्रवाल आदर्श-
जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. केळी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. त्यामुळे केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत उज्ज्वल अग्रवाल यांनी प्रयोगशीलता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम केळी उत्पादन घेतले आहे. त्यांचे प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरले आहेत.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES