• A
  • A
  • A
लेखा परीक्षक कार्यालयात ठेवीदारांचा ठिय्या; ठेवींची रक्कम परत करण्याची मागणी

जळगाव - ठेवींची रक्कम परत द्या, या मागणीसाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयात १०० ते १५० ठेवीदारांनी दीड तास ठिय्या दिला. जिल्हा विशेष लेखापरीक्षक आर. बी. जंगले यांनी आंदोलकांशी चर्चा केली. ठेवी परत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


जिल्ह्यातील भुसावळ येथील सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या संचालकांवर 110 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. यात शेकडो ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. या ठेवी परत मिळाव्यात म्हणून ठेवीदारांचा लढा सुरू आहे. मात्र, त्याकडे सहकार विभागासह लेखा परीक्षक खात्याचे दुर्लक्ष होत आहे.

हेही वाचा - जीवन अमूल्य, त्याचे महत्त्व ओळखा- किशोर राजेनिंबाळकर

भुसावळ येथील सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेवर अवसायक म्हणून जिल्हा विशेष लेखा परीक्षक आर. बी. जंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ठेवीदारांना माहिती मिळत नसल्याने मंगळवारी शेकडो ठेवीदारांनी जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना सहकार विभागासह लेखा परीक्षक विभागाने गेल्या 12 वर्षांपासून झुलवत ठेवले आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. या आंदोलनाप्रसंगी ठेवीदारांच्या काही प्रतिनिधींनी आर.बी. जंगले यांच्यासोबत चर्चा केली. सुमारे तासभर चर्चा केल्यानंतर सकारात्मक आश्वासन मिळाल्याने ठेवीदारांनी आंदोलन मागे घेतले.

'या' होत्या आंदोलकांच्या मागण्या
जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांच्या ठेवींच्या रकमा त्वरित परत कराव्यात, भुसावळ येथील सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या संचालकांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी करण्यात यावी, भ्रष्टाचार करणाऱ्या पतसंस्थेच्या संचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES