• A
  • A
  • A
जीवन अमूल्य, त्याचे महत्त्व ओळखा- किशोर राजेनिंबाळकर

जळगाव -रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यानेच अपघात घडतात. जे कुटुंब एखाद्या अपघातात आपली जवळची व्यक्ती गमावते, त्या कुटुंबावर काय बेतते, याविषयी आपण कल्पना करू शकत नाही. वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळले तर अपघात रोखणे सहज शक्य आहे. जीवन अमूल्य असून प्रत्येकाने त्याचे महत्त्व ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी केले.


उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने सोमवारी सकाळी ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उत्तर प्रदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. चव्हाण उपस्थित होते.
हेही वाचा - 'वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी जंगलांमध्ये भुयारी मार्ग व्हावेत'
किशोर राजेनिंबाळकर पुढे म्हणाले, वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे. ते आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम हे आपल्या सुरक्षेसाठी आहेत. त्यांना घाबरू नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले की, प्रत्येकाला वाहतुकीचे पाळणे म्हणजे सक्ती वाटते. परंतु ते आपल्या सुरक्षेसाठी आहेत. दुचाकी चालवताना हेल्मेट घेतले पाहिजे तर चारचाकी चालवताना सीटबेल्ट लावला पाहिजे. मद्यपान करून वाहन चालवू नये, हे साधे नियम जरी पाळले तरी आपला जीव वाचू शकतो. कारण वेळ कधीही सांगून येत नाही. मद्यपान करून वाहन चालवणारे एखाद्या मिसाईलप्रमाणे असतात. ते कधी कोणाला धडक देतील सांगता येत नाही. असे लोक स्वतःचा तर जीव धोक्यात घालतात तसेच समोरच्या व्यक्तीचा देखील जीव धोक्यात घालतात, असे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा - गुलाबराव - महाजनांमध्ये शाब्दिक कुस्ती, म्हणाले- तुमची लंगोट गादीवरची आमची मातीतली
या अभियानानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सुरुवातीला एसटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या अभिनायाला उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा पोलीस दल, जिल्हा वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एसटी विभाग यांचे सहकार्य लाभले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES