• A
  • A
  • A
वरणगाव शिवारात मृतावस्थेत आढळला बिबट्या

जळगाव - भुसावळ तालुक्यातील वरणगाव शिवारात एक ४ वर्षीय नर जातीचा बिबट्या रविवारी दुपारी मृतावस्थेत आढळून आला. या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट आहे.


या प्रकारासंदर्भात मुलांनी सुधाकर जावळे यांना माहिती दिली. पाटील यांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती दिल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव, फिरत्या पथकाचे वनक्षेत्र अधिकारी धनजंय पवार, वरणगावच्या वनरक्षक दिपाली जाधव, मुकेश बोरसे, वनपाल ललित गवळी, शिपाई एन. एम. वानखेडे आदींनी भेट देऊन पाहणी केली. या बिबट्याच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू एक दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे.
हेही वाचा -अण्णा हजारेंचा सरकारला इशारा, पद्मभूषण पुरस्कार करणार परत
शिकारीचा उद्देश नाही-
मृत बिबट्याची कातडी, नखे व इतर सर्व अवयव सुस्थितीत असल्याने त्याची शिकार झाली नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सलीम तडवी हे सोमवारी सकाळी शवविच्छेदन करणार आहेत. मुक्ताईनगर साहाय्यक वन संरक्षक राजेश दसरे तसेच वरणगाव पोलीस ठाण्याचे हवालदार मनोहर पाटील, संदीप बडगे, अजय निकम यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा -'अजितदादा बच गया, अब सातारा मे सीएम मरेगा'

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES