• A
  • A
  • A
'वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी जंगलांमध्ये भुयारी मार्ग व्हावेत'

जळगाव - जंगलातील रस्ते व रेल्वेमार्गामुळे वन्यप्राण्यांना मुक्त संचार करता येत नाही. अनेक अपघातात वन्यप्राण्यांचे मृत्यू होतात. ही बाब गंभीर असल्याने वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी देशभरातील जंगलांमध्ये भुयारी मार्ग तयार केले पाहिजेत, असे मत महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ सदस्य किशोर रिठे यांनी व्यक्त केले.


हेही वाचा - महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. गुरुमुख...

सातपुडा बचाव कृती समिती व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन परिषदेत किशोर रिठे बोलत होते. विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या सभागृहात ही व्याघ्र परिषद आयोजित केली होती.

वाढते शहरीकरण आणि वाघांच्या संचारमार्गात येणारे विकास प्रकल्प हा चिंतेचा विषय आहे. जंगलातून जाणारे रस्ते, रेल्वेमार्ग, कालवे, विद्युत वाहिनी, वीजनिर्मिती प्रकल्प, कोळसा खाणी यामुळे वन्यप्राण्यांच्या संचार मार्गात अडथळे निर्माण होत असल्याचे मत रिठे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची जीवघेणी कसरत . . . .
या परिषदेस सेवानिवृत्त सहाय्यक प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एस. मिश्रा, नागपूर येथील वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरचे वरिष्ठ प्रोग्राम अधिकारी अजिंक्य भटकर, वन्यजीव कायदा अभ्यासात डेबी गोयंका, डी. डब्ल्यू. पगार, अनिल अंजनकर, अश्विनी खोडपे उपस्थित होते.

विविध विषयांवर मंथन -
या व्याघ्र परिषदेत व्याघ्र अधिवासासह विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्य, सातपुडा भूप्रदेश व्याघ्र संवर्धनाचे महत्व, वन्यजीव संचारमार्ग, समुदायाच्या मालकीचे समुदायाद्वारे संचलित निसर्ग संवर्धन, डोलारखेडा व्याघ्र अधिवास या विषयांवर परिषदेत मंथन झाले.

हेही वाचा - दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी आदर्श, नागपूरकरांनी उघडली पाणी बचतीची...


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES