• A
  • A
  • A
जळगाव जिल्हा कारागृहात २ कैद्यांमध्ये हाणामारी; एकावर ब्लेडने वार

जळगाव - जिल्हा कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर ब्लेडने वार करून त्याला जखमी केले. कुटुंबियांना भेटण्याच्या कारणावरून दोघांमध्ये हाणामारी झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अशी घटन घडली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


इसा शेख हमीद (वय 30, रा. तांबापुरा, जळगाव) असे जखमी कैद्याचे नाव आहे. कुटुंबियांना भेटण्याच्या कारणावरून इसा शेख हमीद आणि सतीश गायकवाड या दोघांमध्ये हाणामारी झाली. हाणामारीत सतीश याने इसावर ब्लेडने वार केले. शनिवारी इसा आणि सतीश या दोघांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी कारागृहात आलेले होते. सुरुवातीला दोघांच्या पत्नीत वाद झाले. त्यानंतर दोघे एकमेकांमध्ये भिडले. दरम्यान, या प्रकाराबाबत कारागृह प्रशासनाने कानावर हात ठेवले असून कैद्यांमध्ये हाणामारी झालीच नाही. त्यांच्या पत्नींमध्ये कारागृहाबाहेर वाद झाला होता, असा खुलासा प्रभारी कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांनी केला आहे.
हेही वाचा- आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर, न्यायालयाच्या सुटकेच्या आदेशाने पुणे पोलिसांना दणका
हाणामारी झाल्याचा कैद्याच्या पत्नीचा दावा -
कारागृहाच्या आत इसा व सतीश या दोन्ही कैद्यांमध्ये हाणामारी झाली आहे. त्यात सतीश याने इसा याच्यावर ब्लेडने वार करून त्याला जखमी केल्याचा दावा इसाच्या पत्नीने केला. आपण जखमी झालेल्या इसाला बाहेरून औषधे व मलमपट्टी आणून दिल्याचेही इसाच्या पत्नीने सांगितले. दरम्यान, कारागृहात कैद्यांपर्यंत ब्लेड पोहचले कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेहमी या ना त्या प्रकाराने चर्चेत राहणारे जिल्हा कारागृह आजच्या घटनेने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES