• A
  • A
  • A
गुलाबराव - महाजनांमध्ये शाब्दिक कुस्ती, म्हणाले- तुमची लंगोट गादीवरची आमची मातीतली

जळगाव - गिरीश महाजन यांचे लंगोट गादीवरचे आहे, तर आमचे मातीतले आहे, असे वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे.


काही दिवसांआधी गुलाबराव पाटलांनी युतीवरुन भाजपवर टीका केली होती. भाजप आणि शिवसेनेत युती झाली नाही, तरी पण आम्ही कुस्तीसाठी लंगोट घालून तयार आहेत, असे ते म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले होते की, युती झाली नाही, तर आम्हीही लंगोट बांधू, अंगाला तेल लावू, कुस्ती खेळू आणि जिंकूही. याला पुन्हा गुलाबराव पाटलांनी आज प्रत्त्युत्तर दिले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १५ फेब्रुवारीला जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या तयारीसंदर्भात जळगाव जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक शनिवारी जळगावात माजी मंत्री सुरेश जैन यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी गुलाबराव पाटील बोलत होते.
हेही वाचा - हा अर्थसंकल्प देशाचे ७० वर्षातील सर्वात मोठे यश, आता लक्ष्य राम मंदिर - अमित शाह
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आपल्यासाठी प्रमाण असतो. मध्यंतरी एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला होता की, जर भाजप आणि शिवसेनेत युती झाली नाही तर काय करणार. युती झाली नाही तर घरी बसायचे का? त्यावेळी मी म्हणालो की, आम्ही लंगोट बांधून तयार आहोत. पण माझ्या या वाक्याचा गिरीश महाजन यांनी चुकीचा अर्थ घेत ते स्वतःच्या अंगावर ओढून घेतले, असेही ते म्हणाले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES